"परिचय अर्थशास्त्राशी" आता YouTube चैनल वर उपलब्ध!



🙏 प्रिय विद्यार्थी मित्र हो आणि सन्माननीय पालक व हितचिंतक हो! 

     जसे की आपण काही जण जाणतच आहात की, "अर्थशास्त्र - जनजागृती अभियान" अंतर्गत नववी, दहावी, अकरावी, बारावी इ. इयत्तेच्या विद्यार्थ्यांची अर्थशास्त्र (Economics) या विषयाशी ओळख / माहिती व्हावी तसेच काही विद्यार्थ्यांची या विषयी असणारी भीती दूर व्हावी आणि या विषयाशी मैत्री होऊन त्यांच्यात "अर्थशास्त्र" विषयी गोडी निर्माण व्हावी  म्हणून प्रशीक एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन, मुंबई या आपल्या संस्थेच्या माध्यमातून आणि प्रशीक क्लासेस च्या सहकार्याने आपण २६ जून, छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंतीदिनी - शाहू महाराजांचे शिक्षण विषयी आणि आपल्या राज्यात अर्थनीती बद्दलचे त्यांनी केलेले महान काम लक्षात घेता त्यांना अभिवादन म्हणून त्यांच्या जयंती दिना पासून ९वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी या अर्थशास्त्र विषयाचे विद्यार्थ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या जीवनात तसेच देश उभारणीच्या कार्यात असलेले महत्वाचे स्थान लक्षात घेता दर महिन्यातून किमान  १ दा परिचय अर्थशास्त्राशी याविषयी ऑनलाईन लेक्चर चे आयोजन सर्व भारतीयांना कळावे म्हणून विशेषत: हिंदी या राष्ट्रीय भाषेमध्ये करत आहोत. 

     या लेक्चर्स चा बऱ्याच विद्यार्थ्यांना हा विषय समजून घेण्यास फायदाही झाला.  तसेच काही पालकांनीही वेळात वेळ काढून हे लेक्चर अटेंड केले.  तर काही जण तर आपल्या अन्य महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्यामुळे हे लेक्चर अटेंड करू शकले नाहीत.  यांतीलच काही विद्यार्थ्यांच्या आग्रहानुसार आणि काही पालकांच्या सूचनेनुसार हा विषय विद्यार्थ्यांना अजुन समजण्यासाठी पुन्हा पुन्हा ऐकता यावा तसेच नंतर कधीही - कुठेही, इतर - सर्वांनाही ऐकता यावा म्हणून या बाबी लक्षात घेता आपण हे ४५ मिनिटांचे प्रशिक्षण रेकॉर्डिंगकरुन प्रसारित करण्याचे ठरवले आहे.  त्यानुसार आपण Prasheek Entertainments & Educare या आपल्या YouTube चॅनल वरून आज शनिवार दिनांक 21 ऑगस्ट, 2021 रोजी सायं. 7.17 वा. शिक्षिका - पौर्णिमा शेखर साळवी यांच्या हस्ते तसेच सन्माननीय शोभा - कृष्णा साळवी (वलंगकर) यांच्या उपस्थितीत प्रसारित करण्याचा कार्यक्रम पार पाडणार आहोत.  आपणही या मंगल समयी वेळात वेळ काढून https://youtu.be/KOYIG3yv0qM या लिंकवर क्लिक करून  "अर्थशास्त्राचा परिचय" या लेक्चर च्या उद्घाटन प्रसंगी आपली उपस्थिती दर्शवावी.

   🙏🏻 आपणांस अशीही विनंति करण्यात येत आहे की,  किमान एकदा तरी निवांतपणे आपल्या वेळेनुसार हा विषय आपण पुर्णपणे अवश्य स्वतः ऐकावा.  सोबतच आपल्या ९वी ते १२वी पर्यंतच्या आपल्या परिवारातील विद्यार्थ्यांना व परिचित अन्य सर्व विद्यार्थ्यांना ऐकावयास-बघावयास सांगावा. 

     हा व्हिडीओ पाहिल्यावर आपण आपली प्रतिक्रिया (आपल्या इच्छेनुसार - शक्य असेल तर) मला 9821662522 या क्रमांकावर अवश्य कळवावी.  आपल्या सूचनांचेहि स्वागत केले जाईल! 🙏

एकमेकां सहाय्य करू,  अवघे धरू सुपंथ!!

 सधन्यवाद! 

सर्वांचे मंगल होवो - कल्याण होवो! 

आपला नम्र- हितचिंतक,

आनंद कृ. साळवी (संस्थापक, अध्यक्ष - प्रशीक एज्युकेशन & रिसर्च फाऊंडेशन, मुंबई.) 

Be Happy! ☺️👍

                                                                

                        Video Link (Click Here)